शेतकरी बंधूंनो,
तुमच्यासाठी आम्ही आणले आहे “पोषक किट” – फळे व भाजीपाला उत्पादनात परिणामकारक असलेले बायोफर्टिलायझर किट, जे तुमच्या शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. या पोषक किटमधील जैविक घटक (जीवाणु खते) तुमच्या पिकांच्या पोषणासाठी महत्त्वपूर्ण ठरतात आणि पर्यावरणपुरक शेतीला (सेंद्रिय शेती) प्रोत्साहन देतात.
बायोफर्टिलायझरचे (जिवाणू खत) महत्त्व: –
बायोफर्टिलायझर हे पिकांच्या पोषणासाठी महत्त्वाचे घटक आहेत. हे नैसर्गिक घटकांमधून तयार झालेले असून, मातीतील जैविक सक्रियता वाढवतात व जमिनीची सुपीकता सुधारतात. बायोफर्टिलायझरचा वापर केल्याने मातीतील सूक्ष्मजीव कार्यक्षम राहतात, ज्यामुळे पिकांची वाढ आणि उत्पादन वाढते.
पोषक किटमध्ये समाविष्ट घटक व त्यांचे उपयोग: –
1. NPK कन्सॉरशिया:- पिकांना आवश्यक असलेले नायट्रोजन, फॉस्फरस, आणि पोटॅशियम यांची पूर्तता करून पिकांच्या संपूर्ण विकासास मदत करते.
2. फॉस्फरस विरघळवणारे जीवाणू (PSB): मातीतील अव्यवहार्य फॉस्फरस विरघळवून पिकांना सुलभ रूपात उपलब्ध करून देते, ज्यामुळे पिकांना मजबूत मुळं व चांगली वाढ मिळते.
3. मायकोरायझा: पिकांच्या मुळांच्या क्षेत्रफळात वाढ करते, ज्यामुळे मुळांना अधिक पोषण मिळते आणि पाणी शोषण क्षमता वाढते.
4. झिंक विरघळवणारे जीवाणू (ZSB): मातीतील झिंक विद्राव्य करून पिकांना पोषण उपलब्ध करून देते, ज्यामुळे झिंकची पूर्तता होते आणि पिकांची गुणवत्ता सुधारते.
5. सीवेड अर्क (Sea Weed Extract) : या नैसर्गिक घटकामुळे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक पोषक घटक मिळतात, तसेच स्ट्रेस सहनशक्ती वाढते.
पोषक किटची आर्थिकदृष्ट्या परिणामकारकता:-
पोषक किट हे कमी खर्चात उपलब्ध असून, रासायनिक खतांवर होणारा खर्च ३० -४०% पर्यंत कमी करते. या पोषक किटमुळे रासायनिक खते वापरण्याची गरज कमी होते, परिणामी तुमचा खतांवरील खर्च घटतो आणि उत्पादन वाढते. शिवाय, या पोषक किटमुळे मातीची सुपीकता दीर्घकाळ टिकून राहते, ज्यामुळे दीर्घकाळापर्यंत उत्पादनाची गुणवत्ता राखली जाते.
“पोषक किट” आजच वापरा आणि तुमच्या पिकांसाठी नैसर्गिक, शाश्वत व कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवा.
पोषक किटच्या अधिक माहितीसाठी – 7757092091